अतिरिक्त साँफ्टवेअर प्रतिष्ठापीत करीत आहे
- "प्रणाली" यादीमध्ये असलेल्या अनुप्रणाली व्यवस्थापन (Software
Management) या साधनाचा वापर करून तुम्ही सुलभतेने आमच्या ऑनलाईन
रिपॉजिटरीमध्ये उपलब्ध असलेल्या अनुप्रणालींची स्थापना करू शकता (किंवा स्थापित
केलेल्या प्रणाल्या काढून टाकू शकता), या अनुप्रनाल्या आम्ही सुरक्षित आणि
अद्ययावत राहण्यासाठी व्यवस्थित नियोजीत करून ठेवत असतो.
- संगीत आणि चलचित्रे तयार करण्यापासून त्रिमितीय रचना आणि विश्वदर्शन
घडवण्यासाठी, तुमच्या प्रत्येक गरजेकरिता साँफ्टवेअर उपलब्ध आहे!
- जर तुम्हाला हवे असलेले आमच्याकडे उपलब्ध नसेल तर डेबिअन पॅकेज किंवा इतर पॅकेज
रिपॉजिटरींमध्ये ते शोधून पाहा. याद्वारे तुम्ही सोयिस्कर रीतीने ते स्थापित
करू शकाल आणि त्याच्या अद्ययावत प्रति स्वयंचलितरित्या वेळोवेळी प्राप्त करू
शकाल.