- कुबुन्टू समुदायामध्ये अनेकजणांचा स्वेच्छित सहभाग आहे, ज्यांच्यामुळे मुक्त स्त्रोत समुदायांमध्ये कुबुन्टू हा एक मोठा संघ निर्माण झाला आहे. हे सहभागी लोक डिस्ट्रिब्युशनमधील विविध कामे स्वतःहून करतात, गरजूंना सल्ले व तांत्रिक आधार पुरवतात, तसेच कुबुन्टूला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास अमुल्य मदत करतात.
- तुमची कौशल्य पातळी काहीही असो, सामील होणे आणि कुबंटूचे भविष्य साकार करणे सोपे आहे, आणि कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपले स्वागतच आहे.
- या दुव्यावर दिलेली माहिती वाचा आणि बघा तुम्ही कोठे आणि कशा प्रकारची मदत करू शकता! लक्षात ठेवा, येथे सहभागी होणे अतिशय सुलभ आहे आणि तुम्ही पार पाडलेली कामे जगभरातील लक्षावधी लोक पाहू शकतात!
स्थापना लवकरच पूर्ण होईल. आशा आहे की आपल्याला कुबुन्टू नक्कीच आवडेल व त्यावर तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकाल!