कुबुन्टूमध्ये संगीत आणि चित्रपट
- सीडी आणि डीव्हीडी वरून किंवा थेट आंतरजालावरून चित्रफिती आणि संगीत
वाजवण्यासाठी कुबुन्टू तयार आहे!
- एमेरोक संगीत प्लेअर वर तुम्ही तुमच्या संगीत फाइल्स व्यवस्थित
नियोजीत करू शकता व त्या ऐकू शकता, तसेच इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट्स आणि इतर
बर्याच गोष्टी तुम्ही ऐकू शकता. याशिवाय एमेरोक तुमचा संगीत साठा एका
पोर्टेबल संगीत प्लेअर सोबत संकलित करून ठेवते.
- ड्रॅगन प्लेअर द्वारे तुम्ही तुमच्या संगणकावरील, CD किंवा DVD वरील
किंवा थेट इंटरनेटवरील (उदा. युट्युब) स्ट्रीमिंग चित्रफिती पाहू शकता!